चंद्रपूर मनपात महाराष्ट्र दिन साजरा
चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार १ मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी आयुक्तांनी सर्व अधिकारी,कर्मचारी व शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच शहराच्या विकासाकरीता राबणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्राचे राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात येऊन महाराष्ट्राची गौरव गिते वाजविण्यात आली.
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले, सहायक संचालक नगर रचना सुनील दहीकर,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता अनिल घुमडे, उपअभियंता विजय बोरीकर,रवींद्र हजारे,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.