वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे

वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे

चंद्रपूर, दि. 16 : 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे वेगवेगळ्या थीमवर सजविली जाणार आहेत.

2019 च्या निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रावरील मतदान 50 टक्क्यांपेक्षा कमी होते किंवा ज्या मतदान केंद्रावरील टक्केवारी 50 ते 65 टक्के इतकीच होती, अशा परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व त्यांचा संपूर्ण सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविता यावी, म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक समुहामार्फत 50 मतदान केंद्र, बांबु संशोधन व प्रक्षिक्षण केंद्रामार्फत 5, आदिवासी विकास प्रकल्पामार्फत 10, वन विभागामार्फत 10, महिला व बाल विकास कार्यालयामार्फत 10 अशा एकूण 85 मतदान केंद्रावर वेगवेगळया थीम ठेवून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

    यात औद्योगिक समुहामध्ये अल्ट्राटेक सिमेंट लिमी. आवाळपुर, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, सी.टी.पी.एस.चंद्रपूर, अंबुजा सिमेंट लि. व दालमिया सिमेंट लि, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, ए.सी.सी. सिमेंट लि., कोल माईन्स चंद्रपुर, वेकोली वणी-माजरी, साई वर्धा पॉवर जनरेशन प्रा.लि., एम.ई. एल (सेल) चंद्रपुर, बिल्ट बल्लारपुर इंडस्ट्रिस, राजुरी स्टिल मुल, पावर ग्रिड भद्रावती, एम्टा भद्रावती, श्री. सिध्दवली इस्पात लि.,लॉयड मेटल ॲन्ड एनर्जी लि., चमन मेटॅलिक लि., सनविजय रोलींग ॲन्ड इंजिनियरिंग लि., लाईमस्टोन प्रा.लि. कोरपना, एमआयडीसी असोसिऐशन, ऑरोबिंदो कोल माइन्स भद्रावती, केपीसीएल भद्रावती, जीएमआर वरोरा, सनफ्लॉग आर्यन ॲन्ड स्टिल प्रा.लि. वरोरा या कंपन्या मार्फत एकूण 50 मतदान केंद्रे सजविली जाणार आहेत.

    तर बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली मार्फत बल्लारपुर, पहामी, खुटाळा, लोहारा ही मतदान केंद्रे, वन विभागामार्फत बोरगाव देश, संजय नगर, शास्त्रीनगर, दुर्गापुर, चोरा, विसापुर, ब्रम्हपुरी, लोहारा, वाढोणा, पारोधी ही केंद्रे, आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर व चिमूर मार्फत धोपटाळा, नांदा, येरमी येंसापुर, म्हसली, चिमूर, जिवती, पिपरी नेरी, महिला व बाल विकास विभागामार्फत ब्रम्हपुरी, बल्लारपुर, घुग्घुस, कोरपना, वडाळा पैकु, गडचांदुर, राजुरा, पंचशील वार्ड, सास्ती, गोवारी या मतदान केंद्रावर वेगवेगळया थिम ठेवून ‘थिमॅटीक पोलिंग स्टेशन’ तयार करण्यात येणार आहेत.

    त्याचप्रमाणे स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिका-यां मार्फत मतदान चिठ्ठी वाटप करण्यात आलेली आहे व त्याचा पडताळणी अहवाल रोज घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हातील शासकीय अधिकारी / कर्मचारी. आस्थापना, सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्था आदींना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी व वैद्यकीय सुविधा, दिव्यांग मतदाराकरीता व्हिलचेअर, जेष्ठ नागरिकांकरीता ई- ऑटो सुविधा, बाळंतपण महिला करीता हिरकणी कक्ष, पाळणाघर सुविधा, मतदारांच्या मदतीकरीता मदत कक्ष व प्रतिक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रांगेत असलेल्या मतदाराना उष्णतेपासून बचावाकरीता शेडची व्यवस्था, व सेल्फी पॉईट उभारण्यात येणार आहेत.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.