गृह मतदानासाठी अधिकारी मतदारांच्या घरी
गडचिरोली,दि.15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 12 गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होत आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार कोणताही मतदार मतदानापासुन वंचीत राहु नये व मतदानाची टक्केवरीत वाढ होण्यासाठी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गृह मतदान पथकाने मतदारांच्या दारी पोहोचून त्यांचे मत बॅलेट पेपरवर नोंदविले आहे. गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्रात दिव्यांग, वृध्द मतदारासाठी गृह मतदान आयोजित केले आहे. यावेळी मतदान करतांना एक वृध्द महिला व दिव्यांग व्यक्ती.