जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बजावला
मतदानाचा हक्क
भंडारा दि. 15 : येत्या 19 एप्रिल रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी भंडारा तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज सोमवारी पोस्टल बॅलेटव्दारा मतदान केले.
रॉयल पब्लीक स्कुल येथील मतदान केंद्रावर श्री.कुंभेजकर यांनी मतदान केले.तसेच अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण,उपजिल्हाधिकारी लीना फलके,उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे,जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूकीच्या कामावरील अधिकारी कर्मचारी हे टपाली मतदानाने आपला हक्क बजावतात. या केंद्रावर पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी आज मतदान केले. दरवेळी निवडणुकांमध्ये सेवा मतदार (Service Voters) व निवडणूकीच्या विविध कामांसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकांची सुविधा उपलब्ध असते.
ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना मतदानास उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्यांचेसाठी भारत निवडणूक आयोगाने टपाल मतदान केंद्राची (Postal Voting Centre) ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, निवडणूकीच्या कामांसाठी असणारे व्हिडीओग्राफर, वाहनचालक हे पोस्टल मतपत्रिकेव्दारे आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (Facilitation Centre) सुविधा केंद्रात मतदान करत आहेत.
टपाली मतदानाच्या सर्व प्रक्रियांमध्ये उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहु शकतात. 18 एप्रिल रोजी 60 -तुमसर तहसील कार्यालया तुमसर येथे, 61- भंडारा, पोलीस बहुउददेशीय सभागृह, पोलीस मुख्यालय भंडारा, 62- साकोली, तहसील कार्यालय साकोली येथे तर 63- अर्जुनी मोरगाव, कउबास येथे तर 64- तिरोडा औदयोगिक प्रशीक्षण तिरोडा, 65 गोंदीया येथे पॉलीटेक्नीक कॉलेज या मतदान केंद्रावर दुपारी 12 ते मतदान संपेपर्यत पोस्टल बॅलेटव्दारे मतदान होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी रोहीणी पाठराबे यांनी दिली.