श्रीराम मंदिरास वॉटर कुलर मशिन चंद्रगिरीवार परिवारातर्फे भेट
भक्तांना मिळणार थंड पाण्याची सुविधा
सिंदेवाही श्री राम मंदिरास वॉटर कुलर मशिन चंद्रगिरीवार परिवाराची सप्रेम भेट : मंदिरातील भक्तांसाठी थंड पाणी सुविधा सिंदेवाही : संदीप बांगडे शहरातील श्री राम मंदिर परिसरात गुढीपाडवा निमित्त शुभमुहूर्तावर सद्गुरू थुटे महाराज यांचे मूर्तीची पूजन केले. श्री राम मंदिरास विनोद चंद्रगिरीवार परिवारानी ” भाविक भक्तगांसाठी थंड पाण्याची सुविधा मिळावी या करीता वॉटर कुलर मशिन सप्रेम भेट स्वरूपात दिली .”गुरुकृपा” वॉटर मशीनचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात 32 देवी – देवतांचे दर्शन देणारे एकमेव श्रीराम मंदिर आहे. विनोद चंद्रगिरीवार परिवाराचे वतीने गुढीपाडवा निमित्त शुभमुहूर्तावर मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी मंदिर मधील सद्गुरु श्री थूटे महाराज यांच्या मूर्तीचे पूजा, आरती केली. श्री राम मंदिर परिसरात दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व भाविक भक्तगांसाठी ” गुरुकृपा ” थंड पाण्याची सुविधा मिळावी या करीता वॉटर कुलर मशिन सप्रेम भेट देण्यात आली. नवीन वॉटर कुलर मशिन चे पूजन विनोद चंद्रगिरीवार , प्रमोद चंद्रगिरीवार परीवारचे हस्ते करण्यात आले. श्रीराम मंदिर उत्सव कमिटी चे अध्यक्ष मयूर सूचक, व्यापारी अध्यक्ष दिलीप दुस्सावार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, पंकज नन्नेवार, आशिष चिंतलवार, संदीप बांगडे, रामदास भरडकर,लालु सूचक, किशोर भरडकर, राकेश मुंगमोडे , बिट्टू टेप्पलवार,प्रवीण कोल्प्यकवार, प्रमोद मोहुरले यांचे सह इतर राम मंदिर उसत्व समिती सभासद उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी विनोद चंद्रगिरीवार यांचे श्री राम मंदिर उसत्व समिती चे वतीने खूप खूप आभार मानले.