उमेदवारांसमक्ष होणार मॉक-पोल प्रात्यक्षिक
मतदान यंत्र सिंलींग करण्याच्या वेळापत्रकात बदल
उमेदवार किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर जाणाऱ्या इव्हीएम मशीन यंत्रावर अभिरूप मतदान (मॉक पोल) करून इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे सिलिंग(Candidate setting) करण्याच्या प्रक्रियेत उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुधारित वेळापत्रकानुसार सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
12-गडचिरोली-चिमुर लोकसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर जाणाऱ्या इव्हीएम मशीन तयार करण्यासाठी आमगाव, आरमोरी व गडचिरोली विधाानसभा मतदार संघाकरिता सुधारित वेळापत्रक निर्गमित करण्यात आले आहे. यानुसार आमगाव विधानसभा मतदारसंघाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे 10 व 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरिता तहसिल कार्यालय, देसाईगंज येथे 11 ते 13 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, गडचिरोली मतदारसंघाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे 11 व 12 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता, अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली येथे 11 व 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाकरिता शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता आणि चिमुर विधानसभा मतदारसंघाकरिता राजीव गांधी सभागृह, तहसिल कार्यालय परिसर चिमूर येथे दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरक्षा कक्ष उघडण्यात येवून मतदार यंत्र सिलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक लढणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना श्री दैने यांनी दिल्या आहेत.