शेतक-यांचे खाते बोनस रक्कम जमा
भंडारा, दि.8 दि. 09 नोव्हेंबर,2023 च्या शासन निर्णयानुसार, आधारभुत किमंत खरेदी योजना अंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये बिगर आदिवासी प्रवर्गातील क्षेत्रात धान खरेदी करण्या करिता पणन महासंघाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
त्यानुषंगाने 26 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णया नुसार किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत, खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये, केंद्र शासनाने मंजुर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त, योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रती हेक्टरी रु.20,000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार पणन हंगाम 2023-24 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी वर्ग करण्याच्या अनुषंगाने रक्कम रु. 300,51,18,360/- जिल्हा कार्यालयास प्राप्त झालेली असून 8 एप्रिल,2024 अखेर 1,45,848 शेतकऱ्यांचे खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रू. 299,25,39,440.00/- रू. बोनस रक्कम ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेला आहे. असे,आवाहन एस. बी. चंद्रे सहा. जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी कळवले आहे.