स्वीप कार्यक्रमाअंतर्गत युवा मतदाराकडुन संकल्प शपथ कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली,दि.06 : देसाईगंज – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने 12- गडचिरोली चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघा अंतर्गत नविन युवा मतदारांमध्ये मतदानाची जगजागृती करणे करीता सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, देसाईगंज श्रीमती मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनाखाली 67 – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व वरीष्ठ महाविद्यालयामध्ये युवा मतदारांकडुन संकल्प शपथ घेण्याचा उपक्रम पार पाडला.
देसाईगंज, आरमोरी कुरखेडा कोरची तालुक्यातील जवळपास 1700 युवा मतदारांनी तसेच, बहुसंख्य भावी मतदारांनी 19 एप्रील रोजी मतदान करण्याची शपथ घेतली. यामध्ये महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, श्री किसनराव विद्यालय आरमोरी, श्री. किसनराव महाविद्यालय वैरागड, हितकारणी विद्यालय आरमोरी, बाबुराव भोयर ( पाटील ) महाविद्यालय आरमोरी, आदर्श विद्यालय देसाईगंज, स्व. राजीव गांधी महाविद्यालय देसाईगंज, मोहसिन भाई जवेरी महाविद्यालय देसाईगंज, अनिकेत समाज कार्य महाविद्यालय देसाईगंज, वनश्री महाविद्यालय कोरची, श्री. मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालय खुणारा, श्रीराम महाविद्यालय कुरखेडा, ङि के. महाविद्यालय कुरखेडा, गो. ना. मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा, बनपुरकर महाविद्यालय कुरखेडा या महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, सर्व अध्यापक व सर्व विद्यार्थीनी यांनी सहभागघेतला. तसेच सदर उपक्रम पार पाडणेस्तव चारही तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी आणि गट संसाधन केंद्र यांनी
विशेष मेहनत घेतली.