लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त
भंडारा, दि. २: आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या यंत्रणांनी कारवाई करत एक कोटी एक लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ, दारू तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागामार्फत भंडारा विधानसभा क्षेत्रात ४७ लक्ष ९३ हजार ६५६ साकोली क्षेत्रात ८लक्ष १२ हजार ८५५ तर तुमसर विधानसभा क्षेत्रात ४५लक्ष ५९ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण १ कोटी १ लक्ष ६५ हजार ७२१ रुपयाचा मुद्देमाल कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आला आहे.