खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी
दि.01: लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवाराच्या खर्चाला 95 लक्ष रुपयाची मर्यादा आहे. उमेदवारांनी प्रचारादरम्यान या मर्यादेच्या अधिन राहून प्रचार करायचा अपेक्षित आहे . उमेदवारांना रोजच्या दैनंदिन खर्चासाठी तीन नोंद वह्या मधे नोंद करावयाची असून या अनुषंगाने 11भंडारा- गोंदिया या लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी श्री. हर्षवर्धन हे उमेदवारांच्या खर्चाची लेखा तपासणी करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात दिनांक 3, 7,12,17 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजतापासून ही खर्च तपासणी करण्यात येईल, या खर्च तपासणीसाठी उमेदवाराकडून निवडणूक खर्चासाठी नियुक्त प्रतिनिधी किंवा उमेदवार उपस्थित राहू शकतात.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक हर्षवर्धन यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासोबत यंत्रणांचा आढावा घेऊन त्यांना उमेदवारांच्या होणाऱ्या खर्चावर नियंत्रणाबाबत सूचित केले आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष सोनी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली असून उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या चमुचे लक्ष राहणार आहे.