श्री माता कन्यका सेवा संस्थेद्वारा शिवणयंत्र वितरण.
होतकरू गरीब शंभर महिलांनी घेतला लाभ.
श्री माता कन्यका सेवा संस्था सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील होतकरू गरीब स्त्रीयांना शिवणयंत्राचे वितरण “जागर मातृशक्तीचा, ध्यास महिला सक्षमीकरणाचा” या उपक्रमांतर्गत करण्यात आले. ज्या महिलांना उपजिवीकेकरिता गरज आहे आणि ज्यांच्याकडे शिवणयंत्राचा डिप्लोमा आहे. अशा महिलांचा यात समावेश होता.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी श्री माता कन्यका देवस्थान चंद्रपूरच्या सभागृहामध्ये समाजातील होतकरू, गरीब शंभर महिलांना शिवणयंत्र वितरीत करण्यात आले. यावेळी आभासी पध्दतीने जुडून राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्हा यांनी महिलांना आणि संस्थेला शुभेच्छा देत समाजभान जपत संस्था कार्य करीत असल्याबद्दल अभिनंदन केले तर संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार म्हणाले, महिलांच्या आर्थीक सक्षमीकरणाकरिता आज शिवणयंत्र होतकरू गरीब महिलांना वितरीत करताना समाधान होत आहे. यापुढेही संस्था असे सामाजिक उपक्रम राबविण्यात राहील. यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपा महानगर अध्यक्ष राहूल पावडे, अध्यक्षा भाजपा महिला आघाडी चंद्रपूर सौ. सविता कांबळे, महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंह, दिलीप नेरलवार, किरण बुटले, कल्पना बगुलकर, शिला चव्हाण, सुषमा नागोसे, शितल गुरनुले, पुष्पा शेंडे, चंद्रकला सोयाम, वर्षा सोमलकर, मोनिका महातव, संगीता खांडेकर, वंदना तिखे, जयश्री जुमडे, सुवर्णा लोखंडे, वंदना संतोषवार, कल्पना गिरडकर, उषा मेश्राम, भारती दुधानी, रेखा चन्ने आदींची उपस्थिती असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी लाभार्थी महिलांनी श्री माता कन्यका सेवा संस्थेचे आभार मानले.