जलजागृती सत्ताहाला सुरुवात
भंडारा, दि.16 : जलसंपदा विभागातर्फे दिनांक 16 ते 22 मार्च या सप्ताह दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आज दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 9 वाजता वैनगंगा नदी घाटावर जल पूजन मा. अधीक्षक अभियंता श्री विश्वकर्मा साहेब यांचे हस्ते करण्यात आले तसेच वैनगंगा नदी घाट ते खामतलाव शितला माती मंदिरापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुरुवातीला कार्यकारी अभियंता श्री अनिल फरकडे यांनी कार्यक्रमाचे उपक्रमाबाबत प्रास्ताविक केले. अध्यक्षिय भाषण करताना श्री विश्वकर्मा साहेब यांनी पाण्याच्या कमतरते बाबत तसेच उपलब्धतेबाबत माहिती दिली. कार्यकारी अभियंता श्री मोरे साहेब यांनी पाण्याची उपलब्धता व त्याचे नियोजन बाबत माहिती दिली या कार्यक्रमास विशेष अतिथी लाभलेले श्री अविल बोरकर साहेब यांनी पाण्याच्या प्रदूषणाबाबत अवगत केले व पाणी स्वच्छ कसे ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन केले मोटरसायकल रॅलीचे समारोप शीतला माता मंदिर खामतलाव येथे करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जलसंपदा विभागात अंतर्गत असलेले सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.