पारंपरिक शिक्षणासह रोजगारासाठी आवश्यक कौशल्य मिळणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
भंडारा,दि.13 :”पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळाय लाहवे .आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील. यामार्फत राज्यात किमान 20 हजार युवक –युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयां मध्येहे केंद्र सुरु होत आहे. लवकरच 1 हजार महाविद्यालयांमध्येहे केंद्र सुरू करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 अंतर्गत जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून महाविद्यालयामध्येहे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत”, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री लोढायांनी केले.
कौशल्य प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रम
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणा सहव्या व सायिक कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे .पहिल्या टप्प्यात 3 हजार 500 महाविद्यालयां मधून 100 महाविद्याल यांना निवडले आहे .टप्प्या टप्प्याने या मध्ये महाविद्यालय अधिकाधिक सहभाग वाढवला जाईल .प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान 150 युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान 20 हजार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या कौशल्य विकास केंद्रातून 200 ते 600 तासां पर्यंतचे सुसंगत अभ्यास क्रमांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी दिली.