महिलांचा सन्मान हीच पंतप्रधान मोदी जी ची गॅरंटी आहे खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन.
भाजपा महिला मोर्चा च्या वतीने नारी शक्ति वंदन या कार्यक्रमअंतर्गत बचत गटाच्या महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार व मेळावा तसेच सामूहिक नृत्य कला स्पर्धा असे विविध कार्यक्रम माता कन्याका मंदिर सभागृह आलापल्ली येथे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..
आलापल्ली येथे नारी शक्ति वंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा महिला मोर्चा च्या वतीने
अहेरी विधानसभा क्षेत्रातील बचत गटांच्या महिलांचा सत्कार व महिला मेळावा तसेच महिला सामूहिक नृत्य स्पर्धा दि.०६ मार्च २०२४ रोज बुधवार ला माता कन्याका मंदिर सभागृह आलापल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी खासदार अशोक नेते हे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनवण्याकरीता महिला राष्ट्रपती,महिला विधेयक, २८ करोड महिलांचे मोफत जनधन खाते,४ करोड घरकुल,१३ करोड स्वच्छालय,६ करोड महिलांना किसान सन्मान निधीतून वार्षिक ६ हजार रुपये.११ करोड महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन देशाचे प्रधानमंत्री मान.नरेंद्र मोदी यांनी मातृशक्तींचा सन्मान केला आहे.येणाऱ्या पुढिल काळात पण महिलांचा यथोचित आदर सन्मान होणार आहे हीच मोदी ची गॅरंटी आहे.असे सर्व मोदी परिवार एकच आहे , हे मातृ शक्तीने समजून घ्यावे.असे आवाहन खा.नेते यांनी केले.
याबरोबरच पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यानी दहा वर्षाच्या कार्यकाळात महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणले.खा.नेते यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनाची माहिती देत ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासन स्तरावर बचत गटाच्या वतीने महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.असे खासदार अशोक नेते यांनी महिला बचत गट सत्कार व मेळावा तसेच महिला सामूहिक नृत्य स्पर्धा या विविध आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यक्षीय स्थानावरून प्रतिपादन केले.
अनेक वर्षापासून महिला बचतगटा मार्फत अतिशय चागल्या प्रकारे उद्योग करतात अशा महिलांचा साडी चोळी व प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आले.
मातृशक्ती वंदन या कार्यक्रमातून महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे फार्म भरुन घेतले.व महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील तसेच पश्चिम बंगालममधून प्रसारित मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या थेट लाईव्ह कार्यक्रम पाहून पंतप्रधान यांनी महिलांना मार्गदर्शन करत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हीच मोदी ची गॅरंटी आहे. याचा कार्यक्रम टीव्ही कनेक्टिंगवर आलापल्ली येथे प्रसारण आयोजित केला होता. याचा सूद्धा महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम बघितलं.
यावेळी २६ दिवसांचा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे १६ गडकिल्ले सर करणाऱ्या वैभव कोमलवार यांचाही खा.नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,महिला मोर्चा च्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आंकनपल्लीवार,मच्छीमार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष मोहन मदने, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, लोकमत संखी मंच संयोजिका सौ.बुरांडेताई,जिल्हा सचिव सतिश गोटमवार, अल्पसंख्यांक मोर्चा नेत्या रहिमा सिद्धीकी,यु.मो.जिल्हा महामंत्री सागर डेकाटे,सामाजिक नेते मधूकर रापऩ्पंल्लीवार,सामाजिक नेत्या आरतीताई सरोते, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सूनिता चांदेकर,मिनाताई अडगोपल्लवार,पोर्णिमा ईस्टाम,कुंदाताई मेश्राम, संकुतला दुर्गम,निर्मलाताई तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होते.