‘त्या’ जमिनीचे संपादन व मोबदला वाटप नियमानुसारच
Ø बरांज (मो) येथील दिव्यांग प्रकल्पग्रस्त जमीनप्रकरणी उपविभागीय अधिका-यांचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, दि. 09 : भद्रावती तालुक्यातील बरांज (मोकासा) येथील दिव्यांग प्रकल्पग्रस्त देवानंद पुनवटकर यांचे जमीन संपादन व मोबदला वाटप नियमानुसारच केल्याचा खुलासा वरोराचे उपविभागीय अधिकारी यांनी केला आहे.
बरांज मोकासा येथील भीमराव उद्धव पुनवटकर, संतोष उद्धव पुनवटकर, देवानंद उद्धव पुनवटकर आणि माजरी कॉलरी येथील सुलोचना वि. उद्धव पुनवटकर यांच्या मालकीची सर्व्हे नं. 281 आराजी 1.08 शेतजमीन प्रकरण क्र. 8/65/2005-06, निवाडा दि. 23 ऑक्टोबर 2009 रोजी व्हाईस प्रेसिडेंट, कर्नाटक एम्टा कोलमाईंन्स लिमिटेड बंगलोर, शाखा नागपूर यांच्याकरीता संपादीत करण्यात आली होती. सदर कंपनीकरीता वरील निवाड्याप्रमाणे 330 शेतक-यांची एकूण 354.48 हे. आर. जमीन संपादीत करण्यात आली. निवाड्याप्रमाणे सर्व्हे नं. 281 आराजी 1.08 हे. आार. करीता हेक्टरी दर 1 लक्ष 80 हजार 700 रुपये देण्यात आला. त्यानुसार जमिनीचे एकूण मुल्यांकन 1 लक्ष 95 हजार 156 रुपये एवढे होते.
त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम 58547 रुपये व 12 टक्के प्रतिवर्ष प्रमाणे अतिरिक्त घटकाची 17 जानेवारी 2007 ते 23 ऑक्टोबर 2009 पर्यंत एकूण 1010 दिवसांची 64802 रुपये अशी एकूण 3 लक्ष 18 हजार 502 रुपयांची रक्कम भीमराव उद्धव पुनवटकर, संतोष उद्धव पुनवटकर, देवानंद उद्धव पुनवटकर आणि माजरी कॉलरी येथील सुलोचना वि. उद्धव पुनवटकर यांनी दि. 6 जून 2013 रोजी धनादेश क्रमांक 028726 अन्वये बँक खात्यात जमा करण्यात आली. तशी पोच मोबदला वाटप नोंदवहीमध्ये असून जमीन भुसंपादन व मोबदला वाटप नियमानुसारच केल्याचे स्पष्टीकरण वरोराचे उपविभागीय अधिकारी यांनी केला आहे.