अल्पसंख्यांकबहुल शासनमान्य शाळांना अनुदान योजनेसाठी मुदतवाढ
12 मार्चपर्यंत संस्थांनी प्रस्ताव पाठवावे
भंडारा, दि.7 : राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याच्या अनुदान योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी अनुदान योजनेचा लाभ इतरही उर्वरित पात्र शाळांना घेता यावा या दृष्टीने आता शासनास परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. 20 मार्च, पर्यंत शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक शाळांकडून जिल्हाधिकारी कार्यालयांकडे 12 मार्च, 2024 पर्यंत अर्ज प्राप्त होणे गरजेचे आहे.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून पात्र प्रस्ताव शासनाकडे 20 मार्च, पर्यंत सादर करण्यात येणार आहे. तरी देखील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी, शाळा कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी याबाबतचे प्रस्ताव तातडीने विहित मुदतीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावे असे,जिल्हा नियोजन विभागाने कळवले आहे.