लाईनमन दिनाचे औचित्य साधून SVEEP च्या माध्यमातून केली मतदार जागृती!!


लाईनमन दिनाचे औचित्य साधून SVEEP च्या माध्यमातून केली मतदार जागृती!!

!!स्थापन केले Voter Awareness Forum लाखनी तालुका निवडणूक विभागाचा उपक्रम!!

लाईनमन दिवसाचे औचित्य साधून कच्ची मेमन हॉल लाखनी येथे SVEEP कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियाना राबविण्यात आले.

 

        भंडारा,दि.6 :जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा.योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर SVEEP कार्यक्रमांतर्गत मतदार ,नव मतदार व सामाजिक घटकात मतदान जागृती अभियान राबवण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी SVEEP कार्यक्रम जिल्हा भंडारा मा. रविंद्र सलामे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये Voter Awareness Forum तथा Election Literacy Club स्थापन करून 100 टक्के मतदानापर्यंत कसे पोहोचता येईल याविषयी कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.

         याचाच एक भाग म्हणून लाखनी तालुक्यात तहसीलदार तथा नोडल अधिकारी तालुका लाखनी निंबाळकर  गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी SVEEP कार्यक्रम बावनकुळे व लाखनी तालुका सहायक नोडल अधिकारी यांच्या मार्फत तालुक्यात विविध कार्यालयात व शाळा महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून मतदात्यांना व नव मतदारांना  मतदानाप्रक्रियेविषयी व 100% मतदान कसे होईल याविषयी जागृत करण्यात येत आहे.

         महावितरणच्या लाईनमन दिनानिमित्त कच्ची मेमन हॉल लाखनी येथे संमेलन आयोजित केल्या गेले होते. महावितरणचे कर्मचारी गाव खेड्यातील शेतकरी शेतमजूर अशिक्षित व सर्व स्तरातील लोकांशी जुळलेले असतात ह्या कर्मचाऱ्यांनी स्वतःसह ग्रामीण भागात काम करत असताना 100 टक्के मतदान जागृती संबंधी ग्रामीण भागातील जनतेला अवगत करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नोडल अधिकारी सुधाकर झोडे,  रुपेश नागलवाडे, विवेक हजारे,सचिन तितरमारे यांनी लाखनी तालुका SVEEP कार्यक्रम मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.