कानाच्या आजाराचे मोफत रोग निदान शिबीर 17 मार्च पर्यत गरजुनी लाभ घ्यावा.
भंडारा,दि.5 :राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 2 मार्च, ते १७ मार्च २०२४ पर्यंत सप्ताह राबवण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे कानाची तपासणी बहिरेपणाचे आजार, कर्णबधीरता,मूकबधीरता तौतडेपणा व कानाचे इतर आजार यांची तपासणी करण्यात येणार आहे तरी पण शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम यांनी केले आहे.
कानातील मळ, जखम, ऑटो-टॉक्सिक औषधे जास्त गोंगाट आपल्या कानांचे संरक्षण कानांना कर्कश्श आवाज व मोठ्या आवाजापासून वाचवा कानात कोणतीही वस्तू टाकू नका लहान मुले, वयस्क यांच्या कानावर कधीही मारू नका कानाची समस्या अथवा कमी ऐकू येत असल्यास त्वरित वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच रुबेला कानात घाण पाणी जाणार नाही यांची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोयाम जिल्हा रुग्णालय भंडारा विभागानी कळविले आहे.