केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर शहर महानगपालिका मलनिस्सारण प्रकल्प ५४२.०५ कोटी ची मंजुरी शासनाकडून मिळाली असून याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे , शासन नियम आणि निकष नुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे , त्यानुसार प्राप्त तीन निविदा पैकी सर्वात कमी दराची निविदा १८.९% होती . यावर निविदा एजन्सी सोबत चर्चा करून दर कमी करण्याच्या वाटाघाटी केल्या त्यानुसार निविदा एजन्सी अंदाज पत्रक तयार करताना मलनिस्सारण प्रकल्पाकरिता आवश्यक काही बाबी घेतल्या नसल्याचे नमूद केले , याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे मत घेतले असता त्यांनी तपासणी करून काही आवश्यक बाबी सुटल्याचे नमूद केले आणि तो फरक अंदाज पत्रकाच्या ५.०१% असल्याचे सांगितले . त्यामुळे ही बाब मान्य करण्यात आली ,
शिवाय सदर मल निःसरण प्रकल्प हा जुन्या मलनिस्सारण प्रकल्पा सोबत जोडायचा आहे , त्यात अनेक संभाव्य अडचणी आणि जटिल बाबी असल्याने तसेच या कामात tunnel mining
अंतर्भूत असल्याने , चंद्रपूर शहरातील अरुंद रस्ते ज्या मुळे विहित मुदतीत काम करण्यासाठी अधिक खर्च येणार तसेच प्रकल्पात मलनिस्सारण मुख्य संकलन वाहिनी ला घरांची जोडणी करणे हे जटिल काम अंतर्भूत आहे यामुळे वाटाघाटी अंती निविदाकार एजन्सी ने १३.५ % पेक्षा दर कमी करता येणार नाही असे नमूद केले . ज्यात अंदाजपत्रकात न घेतलेल्या बाबी मुळे होणारी ५.१% वाढ अंतर्भूत आहे . अश्या प्रकारे प्रत्यक्ष वाढ ही ८.४ % येते .
या दरापेक्षा कमी करण्यास निविदा कार एजन्सी ने वारंवार वाटाघाटी करून ही नकार दिल्याने या बाबत पुढील कार्य वाही चालू आहे.