उमेद च्या माध्यमातून तालुकास्तरीय बचत गटांतील महिलांना सक्षम बनवणे – खासदार अशोक नेते.
चिमूर येथे बचत गटाचा आढावा सभा खासदार अशोकजी नेते व आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तिकुमार भांगडीया यांच्या उपस्थितीत संपन्न.
चिमूर तालुकास्तरीय सर्व बचत गटाची आढावा सभा आज दिनांक ०३ मार्च २०२४ रोज रविवारी अभ्यंकर सभागृह (किल्ला)ता. चिमूर येथे उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती चिमूर द्वारा आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी खासदार अशोक नेते तर उद्घाटक आमदार बंटीभाऊ भांगडीया हे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून उमेद च्या महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनवणे, ग्रामीण गरीब कुटुंबाची गरीबी दूर करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण व फायदेशीर उत्पन्नाची साधने उपलब्ध करुन त्यांना रोजगार व वेतनाची संधी उपलब्ध करत विविध उपक्रम राबविणे,
उमेद च्या माध्यमातून शासन स्तरावर अनेक योजना राबविण्यात येतात ज्यात महिलांना मोफत शिलाई मशिन योजना,आर्थिक दृष्ट्यातील महिलांसाठी लेक लाडकी योजना,खावटी अनूदान योजना, आंतरजातीय विवाह योजना अशा विविध प्रकारचे अनेक योजना शासन स्तरावर कार्यान्वित आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. याबरोबरच पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यानी दहा वर्षाच्या कार्यकाळात महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणले.खा.नेते यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनाची माहिती देत ग्रामीण भागातील महिलांनी उमेद च्या माध्यमातून शासन स्तरावर बचत गटाच्या वतीने महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.असे खासदार अशोक नेते यांनी तालुकास्तरीय बचत गटाच्या आढावा बैठकीला अध्यक्षीय स्थानावरून प्रतिपादन केले.
आमदार बंटीभाऊ यांनी उद्घाटन प्रसंगी बोलतांना बचत गटाच्या महिलांनी उमेद ची शक्ती निर्माण करून एका हाकेला मातृशक्ती मोठ्या संख्येने एकत्रित जमली हि एक मोठी महिला भगिनींंची ताकद आहे.पाच क्लस्टर मध्ये उमेद साठी जागा उपलब्ध करुन बचत भवन व विक्री केंद्र उभारुन माझ्या आई,बहिणी व महिलांना सक्षम करणे हाच माझा उददे्श आहे. असे या उद्घाटन प्रसंगी आमदार बंटीभाऊ यांनी प्रतिपादन केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भाऊ भांगडीया,संवर्ग विकास अधिकारी राठोड सर,भा.ज.पा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.श्यामजी हटवादे,भाजपा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भरतजी खटी,भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे,भाजपा ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतले,भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनीषभाऊ तुंमप्लीवार,भाजपा जेष्ठ नेते प्रकाश भाऊ वाकडे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष मायाताई नन्नवरे, महिला सरचिटणीस ममताताई डुकरे, भाजपाचे जेष्ठ नेते घनश्याम डुकरे, युवा कार्यकर्ते अजित सुकारे,भाजपाचे विलासभाऊ डांगे,रामचंद्र कांबडी,प्रवीणभाऊ माटेटवार, महिला आघाडीच्या आशाताई मेश्राम,ज्योतीताई ठाकरे,उमेदचे बारसागडे साहेब, तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला भगिनींं उपस्थित होते…