सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने मा.तहसीलदार सिंदेवाही यांना निवेदन
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजितदादा पवार गट) तालुका सिंदेवाहीच्या वतीने मा. तहसीलदार साहेब सिंदेवाही यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक,सुशिक्षित बेरोजगार यांच्या समस्या शासन दरबारी सादर करण्यात आल्या.
यामध्ये १)सिंदेवाही तालुक्यात सुरू असलेली पाणी टंचाई त्वरित दूर करण्यात यावी
२)नळ योजनेअंतर्गत होत असलेल्या पाणी पाणीपुरवठा बीलात कपात करण्यात यावी. व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा.
३) सिंदेवाही शहरातील शिवाजी चौक पासुन महामार्गावर रोड चे सुरु असलेल्या कामात पी डब्लू डी अभियंता यांचे दुर्लक्ष असल्यामुळे काम संथगतीने सुरू आहे.काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे व शहरातील नागरिकांना होत असलेला नाहक त्रास दूर करावा
४) खंडित विजेचा पुरवठा नियमित सुरु असावा.
५) एम आय डी सी येथे कारखाना सुरु करण्यात यावा.
६) गोसीखुर्द धरणाचे पाणी थकाबाई, मरेगाव, खैरी,पवनपार तलाव व उमा नदीत सोडण्यात यावे.शेती,जनावरांना तसेच जनतेला पाण्याची उपलब्धता करून पिण्याचे पाण्याची समस्या सोडवावी.
७) शासकीय योजनाची जनजागृती होणे सिंदेवाही तालुक्यात करण्यात यावी.
८) तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करण्यात यावे.
यावेळी सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दामोधर नन्नावार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सलीम पठाण,तालुका महासचिव आरिफ शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नागराज मेश्राम, राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्षा भाग्यश्री भैसारे,तालुका उपाध्यक्ष सुधीर लोनबले,उपाध्यक्ष बापुजा कोकोडे,शहर अध्यक्ष रमेशभाऊ कावळे, उमाजी नन्नावार, प्रफुल भैसारे,योगेश कुलसंगे,अंबादास कोसे,जगदीश मेश्राम,चंद्रशेखर नागोसे, राजु वानखेडे, परसराम गोरलावार, उमाजी नन्नावार, रमेश नागापूरे, राजेश्वर गायकवाड,राजू ताडाम,गुलाब शेरकुरे,दादाजी कामडी,अंबादास भरडे, मनोज नागपुरे,सुधीर लोनबले,अरविंद रामटेके आदी उपस्थित होते