कौंटुबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम 2005
अंतर्गत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रम संपन्न
गडचिरोली, दि.01:कुटुंबात व समाजात महिलांचे अधिकार व हक्क अबाधित रहावे तसेच स्त्रियांना होणा-या विविध हिंसेपासुन संरक्षण मिळावे यासाठी कौंटुबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंमलात आहे. सदर अधिनियमाची व्यापक प्रमाणात जनमानसात प्रचार प्रसिद्धी व्हावी या करीता दिनांक 29 फेब्रुवारी 2024 ला स्थळ- पंचायत समिती सभागृह, कुरखेडा येथे 12.00 वाजता कौंटुबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
सदर कार्यक्रमा करीता अध्यक्ष म्हणुन धिरज पाटील बि.डी.ओ., कुरखेडा, उदघाटक गणेश कुकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, कुरखेडा पद भुषवुन कौंटुबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या अधिनियमाची गरज का भासली तसेच सदर कायद्याची आवश्यकता किती महत्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले. विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणुन बाळराजे मॅडम प्रशासन अधिकारी पं.स. कुरखेडा, सोनकुसरे पर्यवेक्षिका, बांबोळे पर्यवेक्षिका कुरखेडा व तालुक्यातील उपस्थित महिला यांचे उपस्थितीमध्ये सदर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमामध्ये वर्षा बोरसे, पोलीस उपनिरीक्षक कुरखेडा यांनी कौंटुंबिक हिंसाचार कायदा यामध्ये पोलीस विभागाची भुमिका सांगितले ॲड.जि.एम.नागमोती कुरखेडा यांनी कौंटुबिक हिंसाचार कायदा यामध्ये न्यायालयाची प्रक्रिया व भुमिका विशद केली श्रीमती वनिता घुमे, भद्रावती यांनी कौंटुबिक हिंसाचार कायदा यामध्ये समुपदेशाची भुमिका स्पष्ट केली. तनोज ढवगाये, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडरचिरोली यांनी कौंटुबिक हिंसाचार आणि बालाकांचे कायदे याबाबत मार्गदर्शन केले तर कौंटुबिक हिंसाचार कायद्याची प्रस्तावना, स्वरुप व या कायद्यान्वये मिळणारे लाभ याबाबत ओमप्रकाश नेवारे, संरक्षण अधिकारी, कुरखेडा यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली व रुपाली सोयाम, संरक्षण अधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन समन्वय ओमप्रकाश नेवारे, संरक्षण अधिकारी, कुरखेडा यांनी पार पाडले.