गडचिरोली पोलीस दलाने 03 बैलगाड्या व अवैध दारुसह ४,२२,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलगाड्यांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे दिसुन येते.
काल दिनांक २७/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले.
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणाऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणाऱ्या तीन बैलगाड्या व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने ५० बॉक्समधील २,५२,०००/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या ३ बैलगाड्या व ईतर १,७०,०००/- रुपये किंमतीचा असा एकुण ४,२२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.