सिंदेवाही पुलावर सळाखी बाहेर निघाल्यामुळे अपघाताला कारणीभूत
सिंदेवाही- रामाळा -गडबोरी – वासेरा रस्त्याची दुरवस्था
सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही रामाळा,गडबोरी , वासेरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याशिवाय या रस्त्यावरील रामाळा नदीचे पुलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. हा पूल अरुंद व कमी उंचीचा असून पावसाळ्यात नेहमीच या नदीला पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
याभागातील हे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. रस्त्यावरील पुलावर सळाखी उघडे तसेच खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे .हा नदीवरील पूल अरुंद व कमी उंचीचा असून पावसाळ्यात नेहमीच या नदीला पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावरील रामाळा नदीचे पुलाच्या सळाखी उघड्या पडलेले दिसत आहेत.नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वाहनचालक, शेतकरी, पादचारी यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. हा रस्ता सिंदेवाही येथील मुख्य बाजारपेठेला जाण्यासाठी परिसरातील वानेरी, वाकल, रामाळा,गडबोरी, वासेरा, कळमगाव, मोहाडी, शिवणी, या गावांना शेतीमाल घेऊन जाण्यासाठी नागरिकांना जवळचा आहे. या रस्त्यावर दोन ते तीन वर्षांपासून खड्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी संबंधित बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
– रस्त्यावरील नदीचे पुलावर सळाखी उघड्या पडल्या आहेत. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने नादुरुस्त होत असून वाहनचालकांना त्याचा आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.