अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज 25 मार्च पर्यत सादर करावे-आदिवासी विकास विभाग
भंडारा,दि.28 : राज्यातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती /फिशिप चा लाभ देणे करीता महाराष्ट्र शासनाने Mahadbtmabait, gov.in है ऑनलाईन पोर्टल सुरु केलेले आहे. शैक्षणिक सत्र 2023-2024 करीता ज्या आदिवासी विद्याथ्यांनी इयत्ता 11 वी व त्या पुढील शिक्षणा करीता शासन विद्यापीठ मान्यता प्राप्त शाळा महाविद्यालय संस्थेत प्रवेश घेतला असेल अश्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरु झालेले आहे.
तरी विद्याथ्यांनी प्रवेशित महाविद्यालयास ऑनलाईन अर्ज वेळेत भरावे. ऑनलाईन अर्ज सादर करताना शिष्यवृत्ती करीता आवश्यक सर्व कागदपत्रे जसे विद्यार्थ्यांचे स्वताःचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे मागील वर्षाची गुणपत्रीका विद्यार्थ्यांचे स्वताःचे डोमेशिअल प्रमाणपत्र, वडीलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (चालु वर्षाचे 2023) विवाहीत विद्यार्थीनींचे पतीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (शिष्यवृत्ती करीता उत्पन्नाची मर्यदा 2,लक्ष 50,
हजार इत्यादी कागदपत्रे 15 मार्च,2024 पर्यंत अपलोड करावी, जेणे करुन शिष्यवृत्ती व फ्रिशिपचा लाभ घेणे शक्य होईल तसेच शाळा व महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले अर्ज तपासून, परिपूर्ण अर्ज तातडीने या कार्यालयास ऑनलाईन सादर करावे.
अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 25 मार्च, 2024 पर्यंत ऑनलाईन पोर्टल सुरु राहिल. नंतर ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाही. त्या अनुषंगाने सदर पोर्टल 25 मार्च, 2024 पर्यंत सुरु राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावे. व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहान प्रकल्प अधिकारी, निरज मोरे यांनी कळविले आहे.