शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, आरमोरी येथील निर्लेखित साहित्याचा लिलाव
गडचिरोली, दि.26 : शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, आरमोरी जि. गडचिरोली येथील विविध व्यवसायातील निरूपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे, स्क्रॅप इ. साहित्याची विक्री करण्यात येत आहे. या करिता २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
इच्छूक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, आरमोरी जि. गडचिरोली यथे अधिकृत लेख्यासह मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, आरमोरी येथील प्र.मुख्याधापक आर. एम. डांगे यांनी कळविले आहे.