पोलीसांकडून अॅक्सीस बॅक सिहोरा येथे मॉक ड्रिल
बॅक ऑफ इंडिया व इतर ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास व बंधक नागरीकाची सुटका कशी करावी. याबाबतचे प्रात्याक्षीक बँक ऑफ इंडिया सिहोरा येथे पोलीस प्रशासन दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ ला मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी बालाघाट श्री. चौधरी यांचे मार्गदर्शनात, उपविभागीय पोलीस अधीकारी तुमसर नितीपुडी रश्मिताराव यांनी बँक ऑफ इंडिया सिहोरा येथील अधिकारी यांचे सोबत बैठक घेवुन त्याना घेण्यात येणारे प्रशिक्षणाबात (मॉक ड्रिल) माहिती देवुन त्याची संमती घेण्यात आली.
आज दिनांक २३/०२/२०२४ ला १५.०० वा बँक ऑफ इंडिया सिहोरा येथे दहशतवाद्यांचा दरोडा पडून बँक लुटण्यासंबंधात रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामध्ये बँकेमध्ये तीन डमी दहशतवादी आत मध्ये प्रवेश करुन तेथील तीन लोकांना ओलीस ठेवले आहे. अशी माहिती मिळताच तात्काळ, स. पो. नि. नितीन मदनकर आ. गु. शा भंडारा, पोउपनि. रेवतकर यांनी नियत्रंण कक्ष भंडारा प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेश थोरात व वरीष्ठांशी समन्वय साधुन स. पो. नि. निलेश गोस्वामी पो. स्टे. सिहोरा, पो. नि. ब्राम्हणे, पोलीस स्टेशन तुमसर, स. पो. नि. गिरी पो. स्टे. गोबरवाही, पो. नि. चिचोंळकर स्थागुशा भंडारा, स. पो. नि. सुबोध वंजारी दहशतवाद शाखा भंडारा, पो. नि. बोरकर जि. वी. शा भंडारा, पो. नि. संजय एकता खैरलांजी बालाघाट, क्युआरटी पथक, आरसीपी पथक, बिडीडीएस पथक, श्वान पथक, नक्षल सेल, सुरक्षा शाखा, स्थागुशा,
पोलीस स्टेशन सिहोरा स्टॉप, पोलीस वैदयकीय चमु, यांना घटनास्थळ येथे तात्काळ हजर राहण्याचे सुचना दिली. वरील सर्व पथके घटनास्थळी हजर झाले. उपविभागीय पोलीस अधीकारी नितीपुडी रश्मीताराव यांनी घटनास्थळाची सुत्रे हातात घेतले. व दहशवाती यांच्या सोबत त्याच्या मागणी संबधात संवाद साधुन बँक ऑफ इंडिया सिहोरा परीसरात दहशतवादयांना ताब्यात घेण्यासाठी क्युआरटी पथक यांना प्राचारण करण्यात आले. क्युआरटी पथक यांनी घेतलेल्या (मॉक ड्रिल) प्रमाणे दहशतवादयांना ताब्यात घेवुन बंधक नागरीकांची सुटका करण्याची कारवाई करण्यात आली. श्वानपथक व बिडीडीएस पथक यांनी दहशतवादयांची बॅगकशी उचलण्या संबंधात (मॉक ड्रिल) प्रमाणे कारवाई केली.
तरी समोर असणाऱ्या महाशिवरात्री निमीत्त सर्व नागरीकांना सर्तक राहण्याची आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांनी केली आहे.