78 संशयित हृदयरुग्ण लाभार्थ्यांची शिबिरात 2 डी ईको तपासणी
भंडारा, दि.23 :जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येते, आरोग्य तपासणीअंती भंडारा जिल्हयामध्ये एकुण २७४ लाभार्थी आढळून आलेले आहे त्यानुषंगाने सदन संशयित हृदयरुग्ण लाभार्थ्याचे २ डी ईको तपासणी शिबिर दि. २३ फेब्रुवारी २०२४ ल जिल्हा रुग्णालय भंडारा येथे घेण्यात आले, सदर शिबिरामध्ये ७८ संशयित हृदयरुग लभार्थ्याचे २ डी ईको काढण्यात आले त्यामध्ये ३१ लाभार्थीना नागपूर येथे हृदयरो शस्त्रक्रियेकरीता संदर्भीत करण्यात आले.
सदर शिबिरात रुबी चाईल्ड हार्ट क्लिनिक नागपूर येथील बाल हृदयरोग ता डॉ प्रमोद आंबटकर यांनी ७८ बालकाचे रडी ईको काढले असून उर्वरीत १९६ संशयि हृदयरुग्ण याची महिन्याच्या प्रत्येक शुक्रबारला २ डी ईको शिबिर आयोजित करण्यात येणा आहे. सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ दिपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सा जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी केले आहे यावेळी डॉ मिलींद सोमकूवर जिल्हा आर अधिकारी जि.प.भंडारा, डॉ अतुलकूमार टेंभूर्णे, अति जिल्हा शल्यचिकित्सक जि रु. भंडा डॉ अमित चुटे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बास) जि.रु. भंडा डॉ भुपेंद्र धुर्वे बालरोग तज्ञ डिईआयसी तसेच सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व जि शेर्घ हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.