अंगणवाडी सेविकांकरिता एड्स आजारावर कार्यशाळा संपन्न
गडचिरोली, दि.15: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी बाल विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे अंगणवाडी सेविका यांचे एच.आय.व्ही./ एड्स या विषयवार संवेदिकरण कार्यशाळा घेण्यात आली होती.
प्रमुख उद्देश म्हणजे अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण / संवेदिकरण अत्यंत महत्वाचे आहे कारण ते आरोग्य आणि
अंगणवाडी सेविका या माता आणि बाल आरोग्याशी निगडीत असल्याने अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षिण गरोदर मातांमध्ये एच.आय.व्ही. चाचणी सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. एच.आय.व्ही. संक्रमित गरोदर मातांपासून बाळाला एच.आय.व्ही. संक्रमण होवू नये यासाठी गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्याच्या आत गर्भवती महिलेची एच.आय.व्ही. तपासणी करणे आवश्यक आहे..
कार्यशाळेमध्ये एच.आय.व्ही./एड्स बद्दल माहिती, प्रसाराचे मार्ग, आजाराबाबत समज / गैरसमज, कलंक व भेदभाव मिटविणे, एच.आय.व्ही. प्रतिबंधात्मक उपाय, उपचाराच्या उपलब्ध सोयी सुविधा, ए.आर.टी. सेंटर तसेच तसेच लैंगिक आजाराबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आणि जनजागृतीपर साहित्य देण्यात आले.
या कार्यशाळेला बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ.एस.व्ही.गाडगे, श्रीमती. लागीता झरकर (पर्यवेक्षिका), जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, डॉ. अभिषेक गव्हारे, समुपदेशक किशोर रामटेके, सौ. आम्रपाली गणवीर आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते,असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.