चुकीने नाव डिलीट झालेल्या मतदारांनी नमुना सहा भरून देण्याचे आवाहन
भंडारा,दि.15 : 1 जानेवारी , 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 21 जुलै, 2023 ते दिनांक ,21 ऑगष्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी पडताळणी करून आढळून आलेल्या कायम स्वरूपी स्थलांतरीत व मृत्यू पावलेल्या मतदारांची मतदार यादीमधून नावे वगळणी करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
तसेच दिनांक 27ऑक्टोंबर,2023 ते दिनांक 09 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मोठया प्रमाणात मतदारांची वगळणी करण्यात आलेली असल्यामुळे एखादया मतदाराचे नांव मतदार यादीमधून चुकीने वगळणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे 23 जानेवारी ,2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीचे संपुर्ण वाचन करणेकरीता विशेष: करून DELETED शिक्का मारलेल्या मतदाराचे नांवांचे वाचन करणेकरीता व चुकीने वगळण्यात आले असल्यास सदर गावसभा/ वार्ड सभेत त्याच वेळेस संबंधीत मतदाराकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत नमुना 6 भरून घेण्यासाठी दिनांक 13 व 14 फेब्रुवारी,2024 रोजी विशेष वार्डसभा आयोजीत करण्याचे निर्देश 61 भंडारा विधानसभा मतदार संघाचे मा. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भंडारा गजेंद्र बालपांडे तसेच महेंद्र सोनोने तहसिलदार पवनी दिल्यानूसार 13.फेब्रुवारी,2024 रोजी पवनी तालुक्यातील ग्रा. पं. लोणारा 342 मतदान केंद्र, काकेपार मतदान केंद्र क्र 421, मोहरी मतदान केंद्र 364 मतदार यादीचे वाचन करण्यात आले. व ज्या मतदाराचे चुकीने नाव डिलीट झाले असेल त्याकरीता नमुना 6 भरून घेणेकरीता आवाहन करण्यात आले.
सदर गाव सभेला ग्रामपंचायत सचिव, रोजगार सेवक, बिएलओ, सरपंच, ग्रा. प सदस्य, गावातील इतर वयस्क मतदार उपस्थित होते. तसेच मोहरी येथील गावसभेकरीता श्रीमती शुभदा धुर्वे (पुरामकर) निवडणूक नायब तहसिलदार, पी. आय. बोरकर , मंडळ अधिकारी आसगाव हे उपस्थित होते.