महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे नि:शुल्क प्लास्टिक प्रोसेसिंग प्रशिक्षण
Ø 15 फेब्रुवारी रोजी मुलाखतीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 13: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत नि:शुल्क “प्लास्टिक प्रोसेसिंग प्रशिक्षण” आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता गुरुवार, दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता सिपेट, एम.आय.डी.सी., इंडस्ट्रियल एरिया, ताडाळी, चंद्रपूर येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी, प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता 15 फेब्रुवारी 2024 रोजी एम.सी.इ.डी, उद्योग भवन, दुसरा मजला, गाळा क्र. 208, बस स्टँड समोर, चंद्रपूर येथे हजर राहावे. अधिक माहितीकरीता एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी संदीप जाने (9637536041) किंवा कार्यक्रम समन्वयक, शितल वाघमारे (9011647075) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी कळविले आहे.