कॉपीमुक्त परिक्षा अभियान जिल्हयात प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी

कॉपीमुक्त परिक्षा अभियान जिल्हयात प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी

दहावीला 16 हजार 261 विदयार्थी तर बारावीला 18 हजार 36 विदयार्थी परिक्षा देणार

सर्व केंद्रप्रमुख व परिक्षकांना बैठकीत सूचना

            भंडारा दि.12 :दहावीची परिक्षा  1 मार्च ते  26 मार्च 2024 दरम्यान  तर बारावीची  परिक्षा 21 फेब्रुवारी ते  19 मार्च 2024  दरम्यान होणार आहेत.दहावी व बारावी  परिक्षा हया विदयार्थ्यीदशेतील महत्वाच्या परिक्षा असून त्यातील गांर्भिय कायम ठेवत जिल्हयात कॉपीमुक्त परिक्षा अभियान राबविण्यात येण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले. जिल्हयात दहावीसाठी 87 तर बारावीसाठी 64 परिक्षा केंद्र  आहेत.यावर्षी दहावीला 16 हजार 261 विदयार्थी तर बारावीसाठी 18 हजार 36 विदयार्थी परिक्षा देणार आहेत.

           नियोजन सभागृहात जिल्हयातील सर्व केंद्रप्रमुख्‍,मुख्याध्यापक व परिरक्षकांची बैठक आज घेण्यात आली.यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपशिक्षणाधिकारी मंगला गोतारणे,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते.

            शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कॉपीमुक्त परिक्षा अभियानाबाबत विस्तृत मार्गदर्शक सूचनांची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे यांनी यावेळी दिली. कॉपीमुक्त अभियानात दक्षता समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे.

             केंद्रावर विदयार्थ्याची तपासणी करण्यात यावी.विदयार्थीनीची तपासणी महीला शिक्षीका,मदतनीस यांच्याव्दारेच करण्यात यावी. परिक्षा केंद्र परिसरात 144 कलमाचे पालन करण्यात यावे.पहील्यादांच केंद्र प्रमुख व परिरक्षक म्हणून काम करणा-यांचे वेगळे प्रशिक्षण घेण्यात येण्याच्या सूचना श्री.कुंभेजकर यांनी दिल्यात.

         मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुर्तकोटी यांनी परिक्षा केंद्रात मोबाईल तसेच कॉपीस प्रोत्साहन देणारे कोणतेही डिजीटल उपकरणाबाबत सजग राहण्याचे निर्देश दिले.पालकांनाही परिक्षा केंद्रातील प्रवेशाबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. तसेच निखळ गुणवत्तेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.