16 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातील प्राचार्याची सभा
गडचिरोली, दि.12:सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायीक, बिगर व्यावसायीक अनुदानित/विना अनुदानित महाविद्यालय यांना सूचित करण्यात येते की, महाडिबीटी संकेत स्थळावरील भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणे करीता तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील नवीन नोंदणीकृत व नुतनीकरण अर्जाबाबत मंगळवार, दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली येथे ठिक 1.00 वा. सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व महाविद्यालयांनी आपले स्तरावरील व विद्यार्थी स्तरावरील प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज योग्य रित्या तपासून घेऊन व त्रुटी पुर्तता करुन पात्र अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे फॉरवर्ड करावे. व सोबत आपल्या महाविद्यालयाचा शिष्यवृत्ती अहवाल घेऊन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयात हजर राहावे.
वरील सभेस अनुपस्थीत राहील्यास व प्रलंबित प्रकरणाविषयी जागरुकता न दाखवता आपले स्तरावरील प्रकरणे प्रलंबित राहिल्यास आणि पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास प्राचार्य या नात्याने सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.