“लिडकॉम आपल्या दारी“ कार्यशाळा संपन्न
भंडारा,दि.9 :संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालयामध्ये “शासन आपल्या दारी“ या संकल्पने अंतर्गत “लिडकॉम आपल्या दारी“ ही कार्यशाळा व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभीये यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सिव्हील लाईन, येथे सुरेश ढगे, विभागीय अधिकारी, लिडकाम, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.अध्यक्षीय भाषणात सुरेश ढगे, विभागीय अधिकारी यांनी महामंडळाच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त देण्यात येणाऱ्या विविध योजनेमध्ये व्याज दरावरील सुटचा लाभ तसेच एक रक्कमी थकीत कर्ज रक्कम भरणा केल्यास त्यावर 50 टक्के व्याजामध्ये सुट मिळेल असे उपस्थितांना प्रतिपादन केले. सोबतच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंन्द्राशी महामंडळाच्या झालेल्या करारानुसार चर्मकार समाजासाठी असलेल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ समाजातील लोकांनी घ्यावा असे आवाहन केले.
तसेच सामाजिक न्याय भवनातील सभागृहात या कार्यक्रमास उदघाटक म्हणून लाभलेले डॉ. सचिन मडावी, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांनी देखील व्यवसायातील स्पर्धा बघता चर्मकार समाजातील युवा वर्गानी चर्मोद्योग सोबतच इतर व्यवसायाकडे वळण्याची सुध्दा गरज आहे असे उपस्थितांना सुचविले.त्याच प्रमाणे महामंडळाकडून इतक्या मोठया प्रमाणात जिल्हास्तरीय कार्यशाळा ही फक्त संत रोहीदास महामंडाळाने आयोजीत करून सर्व समाजबांधवाना एकत्र आणले आहे, आणि महामंडळ रू. 5 लाख सारख्या मोठया रकमेचा लाभ चर्मकार समाजाला देत आहे, ही फार कौतुकास्पद बाब आहे.
तेव्हा लाभाथ्र्यांनी सुध्दा रकमेचा भरणा हा दिलेल्या कालावधीमध्ये व्यवस्थीतरित्या करावा असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. श्री. गणेश तईकर, जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक, भंडारा यांनी लोकांना सांगीतले.
या कार्यक्रमास एम.सी.ई.डी. चे प्रकल्प अधिकारी श्री. जितेंन्द्र चैरे तसेच बार्टीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती योगीता बा्रम्हणकर हया उपस्थित होत्या. लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळेमध्ये अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते महामंडळाद्वारे एन.एस.एफ.डी.सी योजनेअंतर्गत एकूण 06 लोकांना विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य रूपात रू. दोन ते पाच लाख पर्यंतचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
तसेच एम.सी.ई.डीचे प्रशिक्षणासाठी एकूण 60 लोंकाची नोंदणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद गणवीर, लघुलेखक सहा. आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन श्रीमती कल्पना भंगाळे जिल्हा व्यवस्थापक, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या, भंडारा यांनी केले.