उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत कंटेनर विक्रेते यांचे निविदा आमंत्रित
गडचिरोली, दि.07: गडचिरोली जिल्ह्यात दि. 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 35 वे रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली कार्यालयास छोटा कंटेनरची आवश्यकता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कंटेनर विक्रेते यांना याद्वारे कळविण्यात येते की, हे वृत्त प्रसिद्ध होताच दिनांक 13 फेब्रुवारी 2024 च्या आत या कार्यालयास बंद पाकिटातुन निविदा पोहोचतील या बेताने पाठविण्यात याव्यात. उशीरा प्राप्त निविदांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. निविदा दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी उघडण्यात येऊन दोन दिवसांत कंटेनर पोहोचते करण्याची जबाबदारी वितरक यांची राहिल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली विजय रा. चव्हाण यांनी कळविले आहे.