शिवणी वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या घोटाळाची एसआयटी चौकशी करा
◾आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या खात्यात केले लाखो रुपये जमा.
◾ एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची गायकवाड यांची पत्रकार परिषदेतून मागणी.
सिंदेवाही प्रतिनिधी :- वनविभागात मोठ्या प्रमाणात कामे केली जातात तसेच सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रात कोट्यवधींची कामे केली गेली असुन मात्र बिले अदा करताना मोठ्या प्रमाणात घोळ करून पैश्याची अफरातफर झाल्याचा आरोप असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात शिवनी वनपरिक्षेत्रात गवत, पाचोळा कापणे, झुडूप कापणे व तो गोळा करून, त्याचा जाळपोळ करण्याचे करण्यात आले.सदर कामाचे बिले वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था यांच्या बॅक खात्यात जमा केल्याचे असल्याची कागदोपत्री माहिती समोर आली आहे. यासाठी आधार सुशिक्षीत बेरोजगार या संस्थेच्या खात्यात जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त रक्कम त्यांच्या बैंक ऑफ महाराष्ट्र वासेरा येथील बैंक खात्यात जमा केल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे. यासाठी आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेने विभागाला मजूर पुरविले असल्याचे कारण दाखविण्यात आले असले तरी सन २०२०-२१ च्या दस्तऐवज वरुन प्रत्यक्षात आधार सुशिक्षित बेरोजगार या संस्थेने पुरविलेल्या मजुरांची नोंद शिवनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नोंदवहीत कुठेच आढळली नाही. तसेच त्यांचे मोजमाप आणि अभिलेख उपलब्ध नसल्याने मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका आहे.
जी कामे केली आहेत. त्यांचे मोजमाप पुस्तिका नाही, त्यांची अधिकृत नोंद नाही, व त्यांचे मूल्यांकन सुद्धा नाही. तर कोणत्या कारणाने त्या आधार संस्थेच्या बैंक खात्यात वन विभागाने लाखो रुपये जमा केले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. संबंध नसलेल्या बाहेरच्या आधार संस्थेच्या खात्यात लाखो रुपये जमा का केले ? वासेरा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितिच्या बँक खात्यात करोडो रुपये जमा केले आहेत. मात्र ते करोडो रुपये कोणत्या कामावर खर्च करण्यात आले ? याचा काहीच लेखाजोगा कार्यालयात उपलब्ध नाही. असा आरोप करून याबाबत सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी भ्रष्ट्राचार निर्मूलन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीचे स्मरणपत्र जिल्हाधिकारी, तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांना दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच सामान्य कामगार सेवा या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा तक्रार दिली असून सदर घोटाळ्याची एसआयटी मार्फत त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्यात यावी . अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. या संपूर्ण बातमीची जिम्मेदारी मुरलीधर गायकवाड यांनी घेतली आहे.