कोषागार दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचा-यांचा सत्कार
- सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा झाला कोषागार दिन
भंडारा दि. 2 : कोषागार कार्यालयात काल कोषागार दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोषागार अधिकारी मंगला डोरले, स्थानिक निधी लेखा कार्यालयाचे अधिकारी शिलसागर चहांदे, अप्पर कोषागार अधिकारी प्रविण पत्की, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात लेखा-कोषा सेवेतील उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचा-यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबददल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कोषागार कार्यालयातील, व स्थानिक निधी लेखा कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारीवर्ग तसेच जिल्ह्य़ातील ईतर विभागात कार्यरत लेखा व वित्त सेवेतील अधिकारी उपस्थित होते.तसेच जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी उपस्थितांशी संवाद साधला व कोषागार कार्यालयात मिळत असलेल्या सहकार्याबद्दल, सर्व आंहरण व संवितरण अधिका-यांच्या वतीने समाधान व्यक्त केले.
कोषागार दिनानिमीत्त कोषागार कार्यालय सजविण्यात आले होते. तसेच दुपारनंतर अधिकारी व कर्मचारी यांनी बैठे खेळ, गायन, विविध कलाप्रकार सादर केले. कोषागार अधिकारी मंगला डोरले, यांनी गायन व त्यांच्या कवितेच वाचन केले, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा कार्यालय, शशिलसागर चहांदे यांनी सुंदर गाणे गायले. अप्पर कोषागार अधिकारी प्रविण पत्की यांनी तोंडाने शिटी वाजवून देशभक्तीपर गाणे सादर केले. तसेच उपकोषागार अधिकारी श्री.सहारकर, श्री. कोठे यांनी गाणे सादर केले.
श्री. काळे, श्री. आपुरकर, श्री. रंभाड, श्रीमती वाकडे, यांनी श्रवणीय गाणे गावुन उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यानंतर कोषागार अधिकारी मंगला डोरले, व सहायक संचालक श्री. चहांदे यांच्या हस्ते कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांनी कार्यालयीन कामकाजात मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.