‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहभागी व्हा-विवेक जॉन्सन
Ø 10 फेब्रुवारीला ‘रन फॅार लेप्रसी’चे आयोजन
चंद्रपूर, दि. 31 : जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात ‘स्पर्श’- कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यात विविध आरोग्य शिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असून 10 फेब्रुवारी रोजी ‘रन फॅार लेप्रसी मॅरेथॉनचे’ आयोजन गांधी चौक ते जनता कॉलेज व परत गांधी चौक या मार्गाने करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा श्रीविवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिदेच्या जनपद सभागृहात घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार आदी उपस्थित होते.
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा व पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘कलंक कुष्ठऱोगाचा मिटवू या, सन्मानाने स्वीकार करूया’ हे यावर्षीच्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे.