महासंस्कृती महोत्सवाला उत्सर्फुत प्रतिसाद
त्रिवेणी उत्सवांची भंडारावासीयांना मेजवानी
–पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत
भंडारा, दि.26 रेल्वे मैदानातील महासंस्कृती या पाच दिवसीय महोत्सवाचे आज पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते उदघाटन झाले.महासंस्कृती महोत्सव,ग्रंथ महोत्सव,तसेच जिल्हा कृषी महोत्सवाच्या त्रिवेणी उत्सवांची जिल्हावासीयांना मेजवानी असल्याचे प्रतिपादन श्री.गावीत यांनी यावेळी केले.
महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन करतांना पालकमंत्री बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे,खासदार सुनील मेंढे,जि.प.सदस्य देवा इलमे,जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,अपर पोलीस इश्वर कातकडे,मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी उपस्थित होते.तत्पुर्वी कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली.
पोलीस विभागाच्या देशभक्तीपर गीतांनी भरला कार्यक्रमात रंग
प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस विभागातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी व त्यांच्या सहका-यांनी मॉ…तुझे सलाम,मेरी देश की धरती..जय हो यासारख्या देशभक्तीपर गीतांनी वातावरणात जोश भरला.यावेळी उपस्थित नागरिकांनी या गीतांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा आज रेल्वे मैदाना खात रोड येथे थाटात शुभारंभ झाला.
झाडीबोली व झाडीपटटीच्या वैशीष्टयपुर्ण संस्कृतीचा सोहळा साजरा करण्यासाठी व स्थानिक कलावंताना व लुप्त होत चाललेल्या कलाप्रकारांना उजाळा देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन आहे.आदयग्रंथ विवेकसिंधुचे लेखन अंभोरा येथे झाले असल्याचे सांगुन पालकमंत्र्यांनी कृषी महोत्सवातून शेतक-यांना आर्थिक उत्पनन् वाढीसाठी शेतीतील नवप्रयोगांची प्रेरणा या कृषी महोत्सवातून मिळण्याची अपेक्षा श्री.गावीत यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी नगदी पिके देणा-या व बदलत्या वातावरणातही अधिक उत्पादन देणा-या पिकांच्या वाणांविषयी माहिती देण्याची गरज असल्याचे सांगितले.
खासदार सुनील मेंढे यांनीही यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी केले.
त्यांनतर विविध शाळांच्या विदयार्थ्यांनी सांस्कृतिक एकतेचे संदेश देणारे कार्यक्रम सादर केले.
अवघे मैदान ‘सांस्कृतिक’मय
संपूर्ण मैदानावरील आजचे वातावरण ‘सांस्कृतिक’ मय झाल्याचे पाहायला मिळाले.
मैदानावर मोठ्या आकाराची एलईडी वॉल उभारण्यात आली.त्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येत होते.
महोत्सवासाठी प्रवेश निःशुल्क
26 ते 30 जानेवारी दरम्यान पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळत आहे. पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
विविध विभागांचे 50 हून अधिक स्टॉल आहेत.
पालकमंत्री श्री.गावीत यांनी आज या महोत्सवातील स्टॉलना भेट देवून पाहणी केली.तसेच विविध स्टॉलची माहिती घेतली.
यामध्ये लाख उत्पादनापासुन तयार वस्तुची विक्री,निसर्ग पर्यटन व सारस पक्षीविषयक माहिती, महिला आर्थिक विकास महामंडळाचे स्टॉल,बर्डस गॅलरी मध्ये जिल्हयातील पक्षी विभागाचे फोटो,पारंपरिक बियाणे, अगरबत्ती विक्री, खादय स्टॉलमध्ये खादय पदार्थाची रेलचेल आहे.