लोकशाही बळकटीकरणाकरीता युवा मतदारांनी पुढाकार घेऊन मतदान करावे -प्र. जिल्हाधिकारी, धनाजी पाटील यांचे प्रतिपादन

लोकशाही बळकटीकरणाकरीता युवा मतदारांनी पुढाकार घेऊन मतदान करावे
-प्र. जिल्हाधिकारी, धनाजी पाटील यांचे प्रतिपादन

14 वे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप, विविध अधिकारी/कर्मचाऱ्यांना केले गौरवान्वित

गडचिरोली, दि.26: भारतीय संविधानाने नागरिक म्हणून वयाची 18 वर्ष पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, ते मतदानाचे अधिकार वापरून आपल्या देशाच्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी सर्व युवा मतदाराने पुढाकार घेऊन येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये सर्व मतदारांनी निपक्ष व निडर पणे मतदान करणेकरीता आवाहन करून तशी शपथ प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद गडचिरोली च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांनी सर्व मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा देऊन, आजचा दिवस नविन मतदारांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होऊन मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदविल्यामुळे स्वतंत्र भारताचा एक जागृत मतदार म्हणून शासन दरबारी आपली नोंद झाली असल्याचे प्रतिपादन केले.
आज पासून यापुढे होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत निवडणूकामध्ये मतदान करुन मतदानाच्या अधिकाराचा वापर करून वोट फॉर डेमॉक्रशी हे ब्रिदवाक्य आपल्या उराशी बाळगुन आपण भारत देशाची लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच संविधानात उद्देशिकेची सुरूवातच आम्ही भारताचे नागरिक या वाक्याने होते. म्हणजेच नागरिक जो की मतदार आहे, त्याला देशाचे सरकार निवडण्याचा संपुर्ण अधिकार संविधानाने दिला आहे तेव्हा सर्व मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदानाचा हक्क निपक्ष व निडरपणे बजावावा असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी करून आपल्या भाषणात मतदारांचे व मतदानाचे महत्त्व विशद केले. मतदान प्रक्रिया ही आपल्या देशात एक मोठा उत्सव म्हणून पार पाडली जाते. त्या प्रक्रियेत मतदान करून आपला सहभाग सर्वांनी नोंदविणे आवश्यक आहे. मतदानाचे दिवशी शासकिय सुट्टी असते म्हणून कित्येक मतदार बाहेर फिरायला जातात. परंतू जर सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला तर आपण आपल्या निवडीचे शासन निवडू शकतो. यामुळेच खऱ्या अर्थाने लोकशाहीला आपण अधिक मजबूत बनवू शकतो असे मत कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्र. जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचेसह प्रमुख मा. श्रीमती आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., गडचिरोली तसेच मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, नाट्य कलावंत, निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली, प्रसेनजीत प्रधान, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर, तहसिलदार धानोरा राहुल पाटील, तहसिलदार मुलचेरा चेतन पाटील, तहसिलदार एटापल्ली सय्यद हमीद, तहसिलदार कोरची प्रशांत गड्डम, निवडणूक नायब तहसिलदार अमोल गव्हारे, श्रीमती उत्तरा राऊत, निवडणूक शाखेतील अ.का. किशोर मडावी, विवेक दुधबळे, कु.शितल मोहुर्ले, राजू धुडसे, प्रशांत चिटमलवार, मोरेश्वर पटले, संगणक ऑपरेटर दिपक लाकुडवाहे, आशिष निवडींग, निखील बांबोळे, सचिन इंगळे तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्ग व गडचिरोली जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यी उपस्थित होते.
यावेळी मतदान जनजागृतीबाबत तालुकास्तरावर विविध शासकिय कार्यालयामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता चित्रकला व रांगोळी स्पर्धा, वक्त्रृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरवान्वित करण्यात आले.
तसेच जिल्हयातील 18 ते 19 या वयोगटातील नव मतदारांची नोंदणी झाली ते नव मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यापैकी निवडक मतदारांना आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मतदान ओळखपत्राचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन गौरवान्वित करण्यात आले. तसेच निवडणूक प्रक्रिया बळकट करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे योगदान बहुमूल्य आहे. यातील निवडक अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली प्रसेनजीत प्रधान यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर यांनी केले. सुत्रसंचालन निवृत्त नायब तहसिलदार देवेंद्र दहीकर यांनी केले.