यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
भंडारा, 25 : स्थानिक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, लाखांदूर येथे निवडणूक साक्षरता मंडळ (ELC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि तहसील कार्यालय, लाखांदूर, यांच्या वतीने नवमतदार नोंदणी व मतदान संबंधी जनजागृती च्या उद्देशाने मतदार जागरूकता सप्ताह (दि. २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी) ची सुरुवात करण्यात आली.
या अनुषंगाने आज दि. २५ जानेवारी २०२४ रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. दडवे सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वैभव पवार, मा. तहसीलदार, ता. लाखांदूर, श्री. प्रमोद बेले, मा. नायब तहसीलदार, ता. लाखांदूर, श्री. अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार, ता. लाखांदूर, डॉ. राजू गडपायले, नोडल अधिकारी, व डॉ. विनोद बरडे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
२५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून भारतीय मतदारांची लोकशाही वर निष्ठा वाढावी या साठी २०११ पासून २५ जानेवारी हा दिवस निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रीय मतदार दिन’ घोषित केले आहे व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत मतदान संबंधी जागरूकता पोहचावी याचे प्रयत्न विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येते असे मत श्री. वैभव पवार, तहसीलदार, लाखांदूर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. व्ही. दडवे यांनी महाविद्यालयातील सर्व नवमतदार विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय दिनाचे महत्व पटवून मतदार जनजागृती साठी आवर्जून सहकार्य करा असे आवाहन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मतदारांनी घ्यावयाची शपथ घेण्यात आली तसेच मतदार जनजागृती रैली चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. प्रणय वासनिक यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशश्वीते करिता तहसील कार्यालय लाखांदूर चे कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक गण व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थितीत होते.