सोमवार पासून ग्रंथोत्सव २०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन
भंडारा,25 :- उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत भंडारा ग्रंथोत्सव २०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. २९ व ३० जानेवारी २०२४ ला रेल्वे मैदान खात रोड भंडारा येथे करण्यात आले आहे.
ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ ला सकाळी १० वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लिना ढेंगे -फलके, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शशीकुमार क. बोरकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. रविंद्र सलामे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. रविंद्र सोनटक्के इत्यादी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ ला सकाळी ११.३० ते १ वाजता ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री तथा भंडारा जिल्हा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, राज्यसभा सदस्य श्री. प्रफुल्ल पटेल, भंडारा -गोंदिया खासदार श्री. सुनिल मेढे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. गंगाधर जिभकाटे, विधान परिषद सदस्य, शिक्षक मतदार संघ आमदार श्री. सुधाकर अडबाले, पदवीधर मतदारसंघ विधान परिषद सदस्य आमदार श्री. अभिजित वंजारी, आमदार श्री. नानाभाऊ पटोले, आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर, आमदार श्री. राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समीर कुर्तकोटी, महाराष्ट्र राज्य, मुंबई ग्रंथालय संचालक श्री. अशोक मा. गाडेकर, प्रमुख पाहुणे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. लोहित मतानी, जेष्ठ इतिहास अभ्यासक श्री. मोहन बरबडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. धनंजय दलाल उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, दिनांक २९ जानेवारी २०२४ ला दुपारी ३ ते ४.३० वाजता
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक- भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण कार्यक्रमाचे व्याख्याते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री. मोहन बरबडे राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याणचे सहाय्यक उपायुक्त श्री. बाबासाहेब देशमुख, व्हॉईस ऑफ मिडीया, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर परसावार उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ ला दुपारी ११ ते १२.३० वाजता परिसंवाद ग्रंथ व्यवहार, वाचन संस्कृती आणि आव्हाने यावर वक्ते म्हणून डॉ. सुमंत देशपांडे असणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश मालगावे
राहतील. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समीर कुर्तकोटी असणार आहेत.
दुपारी १२.४५ ते १.४५ वाजता लेखकाचे स्वानुभव कथन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत गोडबोले करणार आहेत. त्याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रमोद आणेराव राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती मंगला डोरले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. चेतन भैरम उपस्थित राहतील. दुपारी ३ ते ४.३० वाजता काव्यतरंगात स्थानिक मराठी कवींचा काव्य वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक श्री. धनंजय गभने राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार श्रीमती विनीता लांजेवार उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी वामन शेळमाके, वामन गुरवे, अर्चना मोहनकर, कविता कठाणे, विवेक कापगते, सुरेश खोब्रागडे, रतन लांडगे, अर्चना गुरवे, विद्या ठवकर, कमल सारवे, मेघा भंडारकर, निलिमा लांबकाने, अंजली बांते, सायली झंझाडे, स्वाती शेलोकर, एस. डी. सय्यद इत्यादी कवि सहभागी होणार आहेत.
समारोप कार्यक्रम सायंकाळी ४.३० ते ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद पाखमोडे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल राहणार आहेत. तसेच जिल्हा समन्वय समितीचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लिना ढेंगे – फलके, नागपूरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री. रत्नाकर चं. नलावडे, भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. रविंद्र सलामे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ – दांदळे, जिल्हा साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरूप्रसाद पाखमोडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. धनंजय दलाल इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील वाचकवर्ग, नागरिक व विद्यार्थी- विद्यार्थींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून
ग्रंथोत्सवाचा लाभ व्हावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. रत्नाकर नलावडे यांनी केले आहे.