श्रीरामाचे जयघोषाने दुमदुमली सिन्देवाही नगरी…

श्रीरामाचे जयघोषाने दुमदुमली सिन्देवाही नगरी…

दिव्यांचे कळस ,शोभायात्रेत बाहुबली हनुमानचे नृत्य

शहरातील श्री राम मंदिर येथे अयोध्या येथील २२ जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण झाले. या पार्श्वभूमीवर श्री राम मंदिरातून सायंकाळी शोभायात्रा निघाली रथावर श्री राम ची मूर्ती
विराजमान त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे दिव्यांचे कळस , लेझिम, दिंडी, शोभायात्रेत बाहुबली हनुमानचे नृत्य आकर्षण ,फटाक्यांची आतिषबाजी व भक्तीमय डिजे चे तालावर रामभक्त तसेच महिला तल्लीन झालेले होते श्री राम मंदिर उत्सव समिती चे वतीने आयोजन करण्यात आले होते..
तालुक्यातील परिसरात सिंदेवाही शहरात एकमेव 32 देवी- देवतांचे व 5 संतांचे मूर्ती ,नक्षीकाम केलेले गरुडस्तंभ असलेले श्री राम मंदिर देवस्थान आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा ऐतिहासिक साजरा करण्यासाठी रामभक्त सज्ज झाले. कार्यक्रमानुसार सकाळपासूनच श्री रामनामाच्या गजराला मंदिर परिसरात भक्तांकरिता सोमवार ला सकाळी 11 वाजता श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कार्यक्रम एलसिडी स्क्रीन द्वारे लाईव्ह प्रक्षेपण चे लाभ घेतला. श्री राम मंदिरात आरती, प्रसादाचे वाटप करण्यात आले

– श्री राम मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गाने रांगोळी सजावट , संध्याकाळी भक्तीमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा मध्ये दिंडी, रथावर विराजमान श्रीराम, सर्वांचे आकर्षण मध्यप्रदेशतील प्रसिद्ध बाहुबली हनुमान सोबतिला चार वानरसेना डीजे चे तालावर नृत्य ,महिलांचे डोक्यावर दिव्यांचे कळस, लेझिम पथक, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सिंदेवाही लोनवाही चे महिला, राम भक्तांसाठी डिजे चे तालावर भक्तीमय वातावरणात गीतांच्या सुरेल संगीत, श्रीरामाच्या गजराने शोभायात्रा दुमदुमली होती.
शहरातील मंदिर देवस्थान नेतृत्वात मंदिरातील गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता अशा तीन संगमरवरी दगडांचे आकर्षक मूर्ती व मंदिर परिसरात आकर्षक सजावट केलेली होती .
सर्व गावकरी मंडळी, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, शारदा मंडळ, महिला मंडळ, लोनवाही शहर परिसरातील महिला,युवक,युवती ,विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बंधू,ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच सर्व रामभक्तांचा वेशभूषा परिधान करून सहभाग झालेले होते.
शहरात अनुचित प्रकार होणार नाही याकरिता पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त केलेला होता.
– शहरातील श्री राम मंदिर उत्सव समिती द्वारे राम भक्तांकरीता शोभायात्रेचे आकर्षण व श्री रामाचे जयघोषाने नगरी दुमदुमली होती.

– शहरातील सर्व मंदिरे विद्युत रोषणाईने तसेच तोरण , झेंडे , बॅनर लावून सजलेली होती. श्री रामाचे शोभायात्रा प्रमुख मार्गावरील मंदिर परिसरात तसेच विविध ठिकाणी महाप्रसाद व पिण्याचे पाण्याचे वाटप राम भक्तांसाठी करण्यात आले.

– शहरातील हनुमान मंदिर, शिवाजी चौक मध्ये भक्तीमय वातावरणात श्रीराम चे उत्सव महाप्रसादाचे वाटप करून साजरा करण्यात आले.