भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

Ø 25 जानेवारी रोजी सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखती

चंद्रपूर, दि. 20 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायूदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षक केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या  कालावधीत सी.डी.एस कोर्स क्रमांक 62 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील  इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 25 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतांना त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे यांची बेवसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून (other-PCTC Nashik CDS-62) कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत न्यावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी)असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.