पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 9 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडे अर्ज सादर करावी
भंडारा,दि.18:महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा ,ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यात. वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नांवाने “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ”“ब”“क”“ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रूपये 1,लक्ष रुपये 75,हजार रुपये, 50 हजार रुपये, 25,हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
राज्यातील एका राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रू.50,हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रू. 25,0000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येते.
सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 22 जानेवारी,ते 09/फेब्रुवारी,2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावी.
ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रू.50,हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रूपये 25 हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येते.
सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 22 जानेवारी,ते 09 फेब्रुवारी,2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन अशोक गाडेकर प्र.ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी र.चा.नलावडे भंडारा यांनी कळविले आहे.