जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राज्य क्रीडा दिन साजरा
गडचिरोली, दि.16:महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा, संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आलिम्पिक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिना निमीत्य दि.15जानेवारी, 2024 रोजी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यातआले.
दिवंगत खाशाबा जाधव, गोळेश्वर, कराड जि. सातारा यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, हेलसिंकी 1952 मध्ये पहिले वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले पदक (कास्य) पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान व नवोदिन खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. 15 जानेवारी हा (राज्य क्रीडा दिन) म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली हे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून जगदिशजी मस्के, माजी मुख्याध्यापक तथा जिल्हा समादेशक गृहरक्षक दल हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सुधाकरजी लाकडे, माजी मुख्याध्यापक, वसंत विद्यालय, गडचिरोली, भास्कर घटाळे, तालुका क्रीडा अधिकारी, हेमराज उरकुडे तालुका क्रीडा संयोजक, चामोर्शी, खुशाल मस्के, तालुका क्रीडा संयोजक, गडचिरोली, यशवंत कुरुडकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ऑलिंपीक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिप प्रज्वलन करुन झाली. प्रास्ताविक भास्कर घटाळे, तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले. राज्य क्रीडा दिन साजरा करण्याचा उद्देश व कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले जगदीशजी मस्के यांनी ऑलिंपीकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचे जीवनावर आधारीत त्यांची जीवनी सांगीतली व खेळाडूंना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या मागे न लागता मैदानावरील खेळ खेळल्याने आरोग्य सुदृढ राहील यासाठी दररोज खेळत असणाऱ्या खेळाबद्दल एकनिष्ठ राहील्यास आपले आरोग्य सुदृढ राहील व क्रीडा क्षेत्रात स्वत: चा, जिल्ह्याचा, राज्याचा नाव लौकीक करता येईल. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी आय.टी.आय. चौक ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान खेळाडूंच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. जिल्हा क्रीडा संकुल येथे समापन झाल्यानंतर क्रीडा उपक्रम विषयक व क्रीडा क्षेत्र तसेच त्यामधील करीयर संबंधात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खुशाल मस्के यांनी क्रीडा विषयक विविध विषयावर माहिती सांगीतली. तसेच सुधाकरजी लाकडे यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व सांगुन दररोज मैदानावर खेळण्याचे आवाहन केले. त्यानंतर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, बॉक्सिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यातील विजयी व उपविजयी संघ / स्पर्धकांना पारीतोषीक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडू म्हणून कु. मोनिका शामराव सडमेक, समित शामराव सडमेक, शैलेश कोरेटी, रमन रोशन मसराम, कु. भैरवी नरेंद्र भरडकर, पारस हरिदास राऊत, आशिष बिश्वास, दशरथ गावडे, राम किरण गुरनुले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संचलन नाजुक उईके, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले तर आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध बडकेलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल लोणारे, वरिष्ठ लिपीक, प्रविण बारसागडे, महेंद्र रामटेके, श्री. सुनिल चंद्रे, कुणाल मानकर, सुनिल सहारे, श्रीमती संगीता निकुरे यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व खेळाडूंना खाऊचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.