राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह आयोजन

राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह आयोजन
गडचिरोली,दि.12: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य दि. 12 ते 19 जानेवारी, 2024 रोजी युवा दिन व युवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
युवांचा सर्वांगीन विकास करणे आणि राष्ट्रीय व सामजीक कार्यात सहभागी होण्यासाठी युवकांना उद्युक्त करणे हा या कार्याक्रमाचा मुख्य उद्देश आहे. युवकांमध्ये वक्तीमत्व व नेतृत्व गुण विकसीत व्हावा. राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची महत्वपुर्ण भुमीका असल्याने सामाजीक उपक्रम, आयोजन, नियोजनामध्ये युवांचा सहाभाग वाढविणे. युवांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करणे, शारीरिक क्षमता व व्यायामाची आवड निर्माण करणे तसेच खेळाकडे आकर्षीत करणे, चर्चासत्र, परिसंवाद, युवा मेळावा, राष्ट्रीय एकात्मता उपक्रम इत्यादीच्या माध्यमातुन युवांना प्रोत्साहन देणे याकरीता विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन जिहा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांनी सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत सादर करायचे आहेत. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा.