संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 375 प्रकरणे मंजुर
गडचिरोली,दि.12:ओमकार पवार, (भा.प्र.से.) तहसिलदार, कुरखेडा यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनात कुरखेडा तालुक्यात माहे डिसेंबर, २०२३ मध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संभाव्य लाभार्थी विशेष शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्यानुसार तहसिल कार्यालय, कुरखेडा येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी ओमकार पवार, तहसिलदार, कुरखेडा यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्राप्त झालेल्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकूण ३८३ प्रकरणात, ३७५ मंजुर, ०८ नामंजुर करण्यात आले. त्यापैकी, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकुण १०० प्रकरणात ९८ प्रकरण मंजुर व ०२ प्रकरणे नामंजुर तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत एकूण ११० प्रकरणात १०५ मंजुर ०५ नामंजुर तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत एकूण १०७ प्रकरणात १०६ मंजुर ०१ नामंजुर तसेच इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकूण ६६ प्रकरणात ६६ मंजुर ०० नामंजुर ची कार्यवाही करण्यात आली.
बैठकीत समिती शासकीय अध्यक्ष ओमकार पवार, तहसिलदार, कुरखेडा, समिती शासकीय सदस्य धिरज पाटील, संवर्ग विकास अधिकारी, पं.स.कुरखेडा, व पंकज गावंडे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कुरखेडा, तसेच समिती शासकीय सदस्य सचिव सत्यनारायण अनमदवार, नायब तहसिलदार, (संगांयो) तद्वतच, अरुण गेडाम, अव्वल कारकुन, जगदेव नारदेलवार, अव्वल कारकुन, उमाकांत चतुर, महसुल सहाय्यक व प्रफुल सुरनकर, आय.टी. असिस्टंट हे उपस्थित होते.