मुलगा मुलगी एक समान,नका करु गर्भलिंगनिदान स्त्रीजनजागृती अभियान

मुलगा मुलगी एक समान,नका करु गर्भलिंगनिदान स्त्रीजनजागृती अभियान

स्त्रीभृण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा : जिल्हा शल्य चिकित्सक,आवाहन

 दि.12 : गभलिंग परिक्षण करुन भृण मुलगी असल्यास तिला गर्भातच मारले जाणे हा कायदयाने गुन्हा आहे.तसेच गर्भलिंग परिक्षण करण्यास प्रवृत्त करणे,प्रेरित करणे व अशा कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दर्शवणे,मदत करणे देखील कायदयाने गंभीर गुन्हा आहे.

          ज्याकरिता कलम 23 नुसार गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टराला 3 वर्षापर्यत कारावास व 10 हजार रुपये दंड होऊ शकतो.तसेच गर्भलिंग निदानाची सेवा मागणारे गर्भवती महिलेचे नातेवाईक,मध्यस्थ व इतर संबंधित व्यक्तीस 3 वर्षापर्यत कारावास  व 10 हजार रुपये दंड होऊ शकतो.

          तरी आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला अशी शंका आली की,सोनोग्राफी सेंटर आणि डॉक्टराकडून कायदयाचा भंग होत असेल तर त्याबाबतची खबर देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख एवढी रक्कम पारितोषिक म्हणून ठेवण्यात आली आहे.

         या खबर देणाऱ्या खरी ठरलयानंतर व न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर या पारितोषिक देण्यात येईल.खबर देणाऱ्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल.

          बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्यास खालील पत्त्यावर तक्रार नोंदवावी,हेल्पलाईन क्रमांक 18002334475 यावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा सामुचित प्राधिकारी पीसीपीएनडीटी जिल्हा रुग्णालय, यांनी कळविले आहे.