गडचिरोली: सन 2024-25 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली करिता प्रवेश सूचना

गडचिरोली: सन 2024-25 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी
माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली करिता प्रवेश सूचना

गडचिरोली, दि.10 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन 2024-25 या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
इयत्ता पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज
मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश फार्म परिपूर्ण भरुन प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड किंवा सुविधा केंद्र, शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, एटापल्ली येथे जमा करण्यात यावे. अर्जा सोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो, पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र 1
लक्षापेक्षा जास्त नसावे ( तहसिलदार), पालकाचे/ विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे / विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, (तहसिलदार / उपविभागीय अधिकारी), जन्म प्रमाणपत्र (अंगणवाडी / ग्रामसेवक), दारिद्रय रेषेखाली असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, महिला पालक विधवा/घटस्फोटित/निराधार/ परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत ( आधार कार्ड पडताळणी केलेला), इत्यादी कागदपत्रे गरजेची आहेत. प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड किंवा सुविधा केंद्र शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, एटापल्ली येथे उपलब्ध आहेत. असे आवाहन आदित्य जीवने, प्रकल्प अधिकारी, तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली यांनी केले आहे.